img


Subscribe on:

Latest Podcast

podcast1
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार फुटणार काय? काय म्हणाले मंत्री मुश्रीफ....

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील 25 ते 30 आमदार पक्षातून बाहेर पडणार आहेत. अशी चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहे. त्यामुळं, अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीमध्ये मोठा भूकंप होणार असल्याच्या चर्चेने उधाण घेतले आहे. या चर्चेला अधिक पाठबळ मिळाले ते, उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या आरोपामुळे. कारण त्यांनी देखील अजित पवार राष्ट्रवादीचे 25 ते 30 आमदार फुटणार असल्याचा दावा केला आहे. #sunetrapawar #dcm #HasanMusrif #SharadPawar #Ajitdada #sanjayraut #MaharashtraPolitics #rupalichakankar #ashokkharat #narharizirwal #suniltatkare #MahyutiGovernment #shivsena #NCP #BJP #Sakalaam

podcast1
सुनेत्रावहिनींचा लेटरबॉम्ब पवार कुटुंब एकत्र येणार का?

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत सुरू झालेली सर्वातमोठी 'पॉवर शिफ्ट', सुनेत्रा पवारांची पक्षप्रमुख म्हणून घेतलेली भूमिका, जय व पार्थ पवार या पुत्रांच्या राजकीय वाटचालीची समीकरणे, तटकरे व पटेल यांच्याबाबतची सुनेत्रा पवारांची व पक्षाची भूमिका आणि पवार फॅमिली बाँडिंग या सर्वांचा लेखाजोगा या व्हिडिओमध्ये घेण्यात आला आहे. पहात रहा, ऐकत रहा 'सकलम' #AjitPawar #RashtrawadiCongress #NationalistCongressParty #SunetraPawar #SharadPawar #ParthPawar #JayPawar #MaharashtraPolitics #RohitPawar #SunilTatkare #PrafulPatel #PowerPolitics #PawarFamily #Sakalaam #SakalaamSpecial

ताज्या घडामोडी

पंचगंगा नदीत वाहून आला सुमारे ५० टनांहून अधिक प्लास्टिक कचरा; पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न ऐरण

03-04-2026

कोल्हापूर शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे जयंती नाल्याद्वारे पंचगंगा नदीत वाहून आलेला सुमारे ५० टनांहून अधिक प्लास्टिक आणि इतर कचरा राजाराम बंधाऱ्यावर अडकलाय. यामुळं पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. कोल्हापूर शहर आणि उपनगरात गेल्या दोन दिवसापासून जोरदार पाऊस झाला. यामुळं जयंती नाल्यातून वाहून आलेला ५० टनहून अधिक कचरा राजाराम बंधाऱ्याजवळ नदीपात्रात तटला आहे. साधारणता दोन एकराचे क्षेत्रफळ मावेल इतका हा कचरा नदीपात्रात पसरला होता. महापालिकेने जेसीबीच्या साह्याने हा कचरा हटवण्याचे काम सुरू केले असले तरी याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. याशिवाय नदी प्रदूषणाचा प्रश्नही प्रकर्षाने समोर आला आहे. गेली दोन तीन दिवसात ढगफुटीसदृश्य पावसाने कोल्हापूरला झोडपून काढले. गटारे भरून पाणी रस्त्यावर वाहू लागल्याने रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले. या पाण्यातून मोठ्या प्रमाणात कचराही वाहून आला. कचरा जयंती नाल्याद्वारे पंचगंगा नदीतून वाहत राजाराम बंधारा येथे अडकला. याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महापालिका यंत्रणेला जाग आली. एक जेसीबी, आणि काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सुमारे ५० टनाहून अधिक कचरा यावेळी नदीपात्रातून काढण्यात आला. एकीकडे प्लास्टिक बंदी असताना इथ मात्र नुसता प्लास्टिक चा ढीग आणि ढीग दिसत होता. या कचऱ्यात प्लास्टिकच्या बाटल्या, कचरा भरून टाकलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, थर्माकोलचे कागद, लाकडं आणि अन्य इतर कचरा मोठ्या प्रमाणात दिसून आला. या कचऱ्याकडे बघितल्यानंतर याला जबाबदार कोण ? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणावर साचल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

अनुसूचित जाती उपवर्गीकरण: राज्य सरकारकडून 'अग्रवाल समिती' स्थापन; भाजप- शिंदेसेनेत वादाची ठिणगी!

03-04-2026

महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जातींच्या (SC) उपवर्गीकरणाचा अभ्यास करण्यासाठी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती स्थापन केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, आरक्षणाचा लाभ तळागाळातील उपजातींपर्यंत पोहोचवण्यासाठी हे 'आरक्षणांतर्गत आरक्षण' लागू करण्याची हालचाल भाजपाने सुरू केली आहे.
अग्रवाल समितीला एका महिन्यात अहवाल सादर करायचा असून, ती विविध गटांच्या हरकती आणि निवेदनांची तपासणी करेल. मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री संजय शिरसाट यांनी या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत समाजात संतप्त भावना असल्याचे म्हटले. त्यामुळे आता भाजप शिंदेसेनेमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडल्याचे म्हटले जात आहे. मात्र, आशिष शेलार यांनी हा निर्णय न्यायालयीन चौकटीत असल्याचे स्पष्ट केले. प्रकाश आंबेडकर आणि आंबेडकरवादी संघटनांनी याला 'दलित समाजात फूट पाडणारे' पाऊल म्हणत कडाडून विरोध केला आहे.

त्या दूध संस्थांची चौकशी सोमवार पासून; लवकरच सादर करण्यात येणार अहवाल....

03-04-2026

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ सभासद नोंदणी चौकशीची सुरुवात सोमवारी ६ मार्च पासून होणार आहे. सांगलीच्या सहायक निबंधक दीपा खांडेकर आणि लेखापरीक्षक ए. जी. पैलवान यांची चौकशी समिती म्हणून नियुक्ती केली आहे. पुणे विभागीय दुग्ध उपनिबंधक यांनी गोकुळशी संलग्न असलेल्या सुमारे १२०० दूध संस्थांच्या चौकशीचे आदेश दिलेत. त्यानुसार ही समिती या दूध संस्थांची चौकशी करून त्यांचा एकत्रीत अहवाल देणार आहे.
गोकुळ संघाच्या निवडणुक मे महिन्यामध्ये लागेल अशी शक्यता असतानाच दूध संस्था चौकशीच्या फेऱ्यात अडकल्या आहेत. दरम्यान समिती नियुक्ती झाल्यानंतर 'गोकुळ'मध्ये कोणकोणत्या मुद्द्यांची चौकशी करावी लागणार आहे, याबाबत सहायक निबंधक दीपा खांडेकर यांनी माहिती घेतली. याबाबतची फाईल त्यांना मिळाल्यानंतर चौकशीचे मुद्दे काढून त्या 'गोकुळ'मध्ये चौकशी करणार आहेत. दरम्यान, पुढील शनिवार आणि रविवार सुट्टी असल्यामुळे सोमवार ६ मार्च पासून प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होईल. या चौकशीचा अहवाल एकत्रित पणे विभागीय उपनिबंधक यांच्या देण्यात येणार आहे. यावरच या दूध संस्थांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

राघव चड्ढा यांना राज्यसभा उपनेतेपदावरून तडकाफडकी हटवले; पक्षनिष्ठा सोडून वैयक्तिक ब्रँडिंग कर

03-04-2026

आम आदमी पार्टीने (AAP) राज्यसभेत मोठा फेरबदल करत आक्रमक चेहरा मानल्या जाणाऱ्या राघव चड्ढा यांना उपनेतेपदावरून तडकाफडकी हटवले आहे. त्यांच्या जागी पंजाबचे खासदार अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली असून, या कारवाईने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
चड्ढा हे पक्षाच्या अजेंड्यापेक्षा स्वतःच्या 'पीआर' (PR) आणि सोशल मीडिया प्रतिमेवर जास्त लक्ष देत असल्याची पक्षात चर्चा आहे. तथाकथित लिकर पॉलिसी केस प्रकरणात प्रकरणात केजरीवाल यांच्या सुटकेवर मौन बाळगणे, जेव्हा सर्व विपक्ष मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्धच्या प्रस्ताव करत होते तेव्हा त्यावर स्वाक्षरी करण्यासही राघव चड्ढा यांनी नकार दिल्याचे समोर आले आहे. राघव चड्ढा तुम्ही मोदींना घाबरले आहात. संसदेत आपली बाजू मांडायला मर्यादित कालावधी मिळतो त्यात देश वाचवू शकतो कि विमानतळावर समोसे स्वस्त करण्याच्या गप्पा करायच्या? अशा तिखट शब्दांत 'आप'चे अनुराग ढांडा आणि सौरभ भारद्वाज यांनी चड्ढांवर निशाणा साधला. यामुळे आप मधील अंतर्गत धुसफूस बाहेर आली आहे. "माझ्या शांततेचा अर्थ पराभव समजू नका," असे म्हणत चड्ढांनी संघर्षाचे संकेत दिले आहेत. यामुळे 'आप'मधील अंतर्गत कलह अधिक गडद होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनात मोठे फेरबदल; कोल्हापूरातही कारभारी बदलले..

03-04-2026

महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आलेत. राज्य सरकारने एकूण २५ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिलेत. यामध्ये प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर आणि सोलापूर यांसारख्या महत्त्वाच्या शहरांतील जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांचा समावेश आहे. या फेरबदलात अनेक जिल्ह्यांना नवे जिल्हाधिकारी मिळाले आहेत, तर काही महापालिकांच्या आयुक्तपदी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. महापालिका आयुक्त के.मंजुलक्ष्मी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. कोल्हापूरचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉ.जस्मिन आणि महापालिकेच्या आयुक्त पदी डॉ राजेंद्र भारूड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय कोल्हापूरचे अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे त्याच बरोबर जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा शिंगण यांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर जिल्हात एकाच वेळी या सर्व उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी त्याचबरोबर चारही विषय समित्यांच्या सभापती पदी महिला आहेत. तर आता कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉ जस्मिन यांची निवड झाल्याने कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महिलाराज आल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.


अजून पहा
img
कामात आहात? प्रवासात आहात?

आमचे पॉडकास्ट ऑडिओ स्वरुपात ऐका...

आमच्या Spotify channel ला सबस्क्राईब करा किंवा थेट क्लिक करून ऐका

आमचे नवीन पॉडकास्टस पाहा

आमचे सर्व पॉडकास्टस

असंख्य घटनाच्या कल्लोळातून आपल्या जगण्यावर परिणाम घडवणाऱ्या घटना घडामोडींची चिकित्सा करणारं पॉडकास्ट!

एक अशी संवादमालिका जिथं पुस्तक फक्त वाचलं जात नाही तर ते अनुभवलं जात! या पॉडकास्टमध्ये आम्ही भेटणार आहोत त्या लेखकांना, अनुवादकांना, संपादित करणाऱ्यांना ज्यांची शब्दांनी विचारांना नवी दिशा दिली.

जगभरात घडणाऱ्या. लक्ष वेधून घेणाऱ्या परिणामकारक घटनांचा वेध दर आठवड्याला श्रीराम पवार यांच्या नजरेतून पाहायला विसरु नका

Enjoy New Shows

Latest episodes

img
List of Episodes

Listen Our Podcosts On Go!

Our Testimonals

Reviews from users

imng
imng
imng
img

अतुलनीय संवाद आणि प्रेरणादायक विचार! ह्या पॉडकास्ट ने मला नवीन विचार देणारे आणि जीवनावर नवा दृष्टिकोन आणले.

पर्णा देशमुख
img
img

खूपच ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायक आहे. हे पॉडकास्ट नेहमीच वेगळ्या दृषटिकोनातून विचार मांडतात.

रोहन पटेल
img
img

माझ्या दैनंदिन आयुष्यात नवा उत्साह भरला आहे. ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी खूप शिकले.

दीक्षा शर्मा
img
img
img img
David Michale Episode 13
Previous track button
Large toggle button
Next track button
00:00 / 00:00